प्रेस मीडिया वृत्तसेवा -
दानोळी- लोकसहभागातून सुरू असलेल्या दानोळी येथील दानोळी कोव्हिड सेंटरला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सोमवारी भेट दिली,
सेंटर सुरू करण्यासाठी ज्यांनी सहभाग नोंदवला या सर्व घटकांचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी अभिनंदन केले,
या सेंटर मुळे दानोळी सह परिसरातील गावांमधील कोरोना बाधित रुग्णांना वेळेत मदत मिळाली आणि त्यांच्यावर वेळेत उपचार करता आले,या सेंटर मुळे कोरोना बाधित रुग्णांना मोठा आधार मिळाला, त्यामुळे दानोळी च्या या कोव्हिड सेंटरचे योगदान मोठे असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, कोरोना चा संसर्ग जरी कमी होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यासह आपल्या शिरोळ तालुक्यात अजूनही बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे त्यामुळे नागरिकांनी आणखी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे शासनाने जे निर्बंध घालून दिले आहेत त्याचे पालन करीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी शी बोलताना केले,
बाधित रुग्णांसाठी या कोव्हिड सेंटरमध्ये केलेल्या व्यवस्थेची पाहणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली.
पैलवान केशव राऊत, राम शिंदे, विकास वाळकुंजे, दानोळी चे उपसरपंच सुनील शिंदे, सुकुमार पाटील सकाप्पा, पिंटू पाराज, गणेश साळुंखे, बबलू दळवी, उदय राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते,