बीड दि.१२(प्रतिनिधी):
पत्रकार विनोद जिरे यांचे वडील भगवान गोविंद जिरे यांचे शुक्रवार दि.११रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६६ वर्ष होते.
पत्रकार विनोद जिरे यांचे वडिल भगवानराव गोविंदराव जिरे हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बीड, औरंगाबाद येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. मागील काही दिवसांत त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बीड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची काल शुक्रवार दि. ११ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर नाळवंडी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी नाळवंडी आणि परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकारीतेतील मान्यवर उपस्थित होते.भगवानराव जिरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.