कोरोना प्रतिबंधासाठी 5 वर्षांखालील मुलांना मास्क वापरू नयेत, अशी शिफारस 'डीजीएसएस'ने केली आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) नवी कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. नव्या नियमावलीनुसार 18 वर्षांखालील मुलांना रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये आणि एचआरसीटी स्कॅनिंगचा काळजीपूर्वक वापर करावा. त्याचसोबत कोरोना प्रतिबंधासाठी 5 वर्षांखालील मुलांना मास्क वापरू नयेत, अशी शिफारस 'डीजीएसएस'ने केली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत 'डीजीएचएस'चा कारभार चालतो. नव्या तत्त्वांनुसार 6 ते 11 वर्षांच्या मुलांनी मास्क वापरावेत. मात्र, या वयोगटातील मुलांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वापरावयाचे आहेत.ऑण्टिव्हायरल ड्रग रेमडेसिविर 18 वर्षांखालील मुलांना देऊ नये तसेच 18 वर्षांखालील मुलांची एचआरसीटी तपासणी वारंवार करू नये, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे . डीजीएचएसने कोविज व्यवस्थापनाचा क्लिनिकल मॅनजेमेंट प्रोटोकॉलचा पुनर्आढावा घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने ताप व सर्दी व्यतिरिक्त अन्य औषधांच्या वापरावर बंदी घातली.

Post a Comment

Previous Post Next Post