राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल चार कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये म्हणून सरकारने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने आणि पुन्हा आपण राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे ही थाळी आता मोफत देण्यात येत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.