तारदाळ प्रतिनिधि श्रीकांत कांबळे
शिरदवाड तालुका शिरोळ येथील विशाल वधु वर सुचक केंद्र यांच्याकडून लग्नासाठी वयोमान झालेल्या युवक युवतींकडून घरबसल्या व्हाट्सअप द्वारे आपली नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या जागतिक महामारी मुळे आज महाराष्ट्रावर मोठे आर्थिक आरोग्यदायी आणि उपासमारीचे संकट आले असले तरी शासनाने लागु केलेल्या लाॉकडाऊन काळात दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनाच्या नियमांचे पालन करीत जनता घरीच आहे.त्यामुळे युवा वर्गाचे लग्न समारंभ धोक्यात आले आहे युवक-युवतींचे लग्नाचे वय झाले आहे काहींचे लग्न ठरले आहे तर काहींना मुले मुली पाहण्याचा कार्यक्रम ही काेराेना संसर्गामुळे ठप्प झाला आहे तरी अशा युवावर्गाने या कोरोना महामारीत खचून न जाता आपली कठोर भूमिका घेऊन मानसिक संतुलन ढासळून जाता कामा नये यासाठी शिरदवाड येथील विशाल वधु वर सुचक केंद्रा कडून युवक युवतींकडून घर बसल्या विशाल वधू वर सूचक केंद्राच्या ८८०५८२२७१२ या व्हाट्सअप नंबर वर आपला बायोडाटा पाठवून देण्याचे आवाहन चिंतामणी कांबळे आणि विशाल कांबळे यांनी केले आहे.