शिरोळ-
शिरोळ येथील पंचगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्याची आणि बंधाऱ्यावर सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सोमवारी केली,बंधाऱ्याच्या डागडुजीचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश त्यांनी पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकारी व या कामाचे ठेकेदार माने यांना दिल्या,
63 वर्षापूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याची अलीकडच्या काळात मोठी दुरावस्था झाली होती, 49 गाळे असलेला हा बंधारा तातडीने दुरुस्त व्हावा अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होती,या बंधाऱ्यावरील अवलंबित शेतीसाठी हा बंधारा अतिशय महत्त्वाचा आहे,या बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी रुपये 55 लाख खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली असून या कामाला नुकतीच प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे, असे सांगताना बंधाऱ्यावरील पिलर दुरुस्ती, तळातील व पिलरचे कॉंक्रीट, बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला कॉंक्रिटचे दगड बसवणे त्याच बरोबर स्लॅबचे पॅचवर्क करणे या कामांचा समावेश या निविदे अंतर्गत येतो राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कुरुंदवाड विभागाचे शाखाअधिकारी एस. बी. महाजन यांनी यावेळी दिली,
शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह माने -देशमुख, शिरोळचे माजी सरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, नगरसेवक पद्मसिंह पाटील यांच्यासह मान्यवर व या परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.