वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती सोमवारपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार



प्रेस मीडिया वृत्तसंस्था : 

 पुणे -महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांच्या सहा प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती सोमवारपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.

कंत्राटी वीज कामगार संघाने कायम कामगारांच्या कृती समितीला पाठिंबा जाहीर केला आहे. संघाचे सुमारे 12 हजारांवर सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कंत्राटी कामगार हिताच्या मागण्या असल्याने हा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देऊन शासन लाभ मिळावेत, कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे, कोविडचा उद्रेक पाहता काळात वीजबिल वसुली सक्ती करू नये, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post