पुणे - स्वारगेट परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी स्वारगेट हद्दीमध्ये ढोलेवाडा डायस्प्लॉट भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.यासंदर्भात स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. 93/2021, भा.द.वि. कलम 307, 323, 504, 506, 34, आर्म अॅक्ट 4(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) साठीरोग अधिनियम कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलीस करत असताना पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दाखल गुन्ह्यातील आरोपी अक्षय कांबळे, सागर मावस व दोन विधीसंघश्रित बालक (रा.सर्व मागवाडा, गुलटेकडी, पुणे )यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, पोलीस अंमलदार सचिन कदम, विजय कुंभार, विजय खोमणे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, वैभव शीतकाल, लखन ढावरे, शंकर गायकवाड, ऋषि तिटमे, यांच्या पथकाने केली