जर ही परिस्थिती राहणार होती, तर मग लसीकरण का सुरु केले ....महापौर मुरलीधर मोहोळ



पुणे :  देशभरात आजपासून (दि.1 मे) तिस-या टप्प्यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे शहरासाठी 7 दिवसांसाठी फक्त 5 हजार देण्यात आल्या असून त्या पुरवायच्या कशा असा प्रश्न महापालिकेला पडलल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. जर ही परिस्थिती राहणार होती, तर मग लसीकरण का सुरु केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आजपासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण होणार असल्याने अनेक केंद्रावर गर्दी झाली होती. यात नोंदणी केलेले आणि न नोंदणी केलेल्या नागरिकांचा समावेश होता. शहरात असे जवळपास 20 लाखांच्या आसपास नागरिक आहेत.पण लसींचा अतिशय तोकडा पुरवठा झाल्याने लसीकरण करायचा कसा असा प्रश्न असल्याचे मोहोळ म्हणाले. दोन केंद्रावर दिवसाकाठी 700 लसी वापरल्या जातील, असे लक्षात आल्याने आम्ही नागरिकांना गर्दी करू नये, असे जाहीर केेले होते. तरी देखील नागरिकांनी गर्दी केली होती. केंद्र सरकारकडून 18-44 वयोगटासाठी फक्त 5 हजार लसी देण्यात आल्या असून त्या 7 दिवस पुरवायला सांगितल्या आहेत. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात हे लसीकरण होणार आहे. नागरिकांनी नोंदणी केली नसेल तर गर्दी करू नये, अशी विनंती महापौर मोहोळ यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post