लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार ..महापौर मुरलीधर मोहोळ.



प्रेस मीडिया वृत्तसंस्था : 

 पुणे : गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, लसीकरणाला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, एप्रिल महिन्यात एक्टिव्ह रुग्णसंख्या 56 हजार होती. मात्र, आता ही रुग्णसंख्या 12 हजार आहे. महिन्याभरात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 44,300 ने कमी झाली आहे. शहरात समाधानकारक चित्र निर्माण झाले असून, हे सामुहिक यश आहे.टेस्टिंगच्या बाबतीत देखील पुणे पुढे आहे. दररोज 22 मेट्रिक टन ऑक्सिजन शहरात निर्माण केला जात असल्याचे त्यांन सांगितले.तसेच, महापौर विकास निधी देखील कोविड विरुद्धच्या लढ्यात वापरण्यात आला. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी 3 लाख रुपये मदतनिधी महापालिकेकडून दिला जात आहे, असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसात पुण्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यावर बोलताना मोहोळ म्हणाले की, शहरात आतापर्यंत 10 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीसाठी पुणे महापालिका देखील मुंबईप्रमाणेच ग्लोबल टेंडरचा विचार करत आहे. सीरम इंस्टिट्यूटमार्फत थेट लस उपलब्ध होईल का ? यासाठी देखील प्रयत्न.

Post a Comment

Previous Post Next Post