पणजी : 'तौक्ते'चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असून आता हळूहळू नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचे संकेत मिळू लागले आहेत. गुजरातला धडकल्यानंतर तौक्ते'चक्री वादळाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावानंतर आता दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विषुववृत्ताकडून वाऱ्यांच्या प्रवाहामुळे या भागात कमी दाबाचा पत्ता निर्माण होऊ लागला आहे. साधारणतः अंदमान निकोबार बेटांवर 18 ते 20 मेपर्यंत दाखल होणाऱ्या मॉन्सूनला यंदा उशीर झाला असला तरी चक्रीवादळामुळे आता या भागात मॉन्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता 23 मेपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पत्ता निर्माण होण्याची शक्यता आहे.खात्याने वर्तवली आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता यावर्षी वेळेआधीच म्हणजेच 31 मे रोजीच मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर यंदाच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत 98 टक्के पावसाची शक्यताही वर्तवली आहे. तर साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमने महाराष्ट्राच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, गुजरातला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता ओसरू लागली असून आता ते काही प्रमाणात राजस्थानकडे सरकले आहे. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनच्या पावसामध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. केवळ दोन आठवड्यातच मॉन्सून केरळमध्ये धडकणार असल्याचे दिसत आहे. पावसाळ्याच्या आगमनाची पूर्व निर्धारित तारीख 1 जून असली तरी यावर्षी 31 मे पर्यंतच मॉन्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तविला आहे. तथापि स्कायमेटने 30 मेचा अंदाज वर्तविला आहे.