नवी दिल्ली : बिस्किट हा पदार्थ असा आहे, जो लहान, मोठे, वृद्ध सर्वांनाच आवडतो. सकाळी वाफाळत्या चहासोबत बिस्किट मिळालं की चहा घेण्याचा आनंद द्विगुणीत होऊन जातो आणि बिस्किट म्हटलं की पहिलं नाव येतं ते पारले-जी केवळ भारतातच नाही, तर जगभरात या बिस्किटचे चाहते आहेत. पारले-जी हे भारतातील सर्वात जास्त विकले जाणारे बिस्कीट आहे. भारतात तुम्हाला एकंही असं घर आढळणार नाही, जिथं पारले-जी आणलं गेलं नसेल. अनेकांची तर सकाळ पारले-जी सोबत होते. हे बिस्किट अतिशय स्वस्त असून त्याची चवं तेवढीच निराळी आहे. चला तर जाणून घेऊया या पारले-जी बिस्किटांचा इतिहास.
एका बंद पडलेल्या जुन्या कारखान्यातून झाली. 1929 मध्ये मोहनलाल द्याल नावाच्या एका व्यापाऱ्यानं हा कारखाना विकत घेतला. तिथं त्यांनी कन्फेक्शनरी बनवण्याचं काम सुरू केलं. भारताच्या या पहिल्या कन्फेक्शनरी ब्रँडचं नाव त्या ठिकाणावरून पडलं. हा कारखाना सुरू झाला तेव्हा तिथं केवळ घरातील लोकच काम करत होती. कारखाना सुरू झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1939 साली इथं बिस्किट बनवण्याचं काम सुरू झालं. त्याच वर्षी या बिझनेसला अधिकृत नाव देण्यात आलं. पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने इथं बिस्किट बनू लागले. कमी किंमत आणि चांगल्या क्वालिटीमुळे अल्पावधीतच ही कंपनी लोकप्रिय झाली. त्यावेळी या पारले बिस्किटचं नाव पारले ग्लुको होतं.1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अचानक देशात गव्हाचा तुटवडा जाणवू लागला. हे बिस्किट गव्हापासून तयार होत असल्यानं पारलेला ग्लूको बिस्किटांचं उत्पादन थांबवावं लागलं. नंतर कालांतराने पुन्हा उत्पादन सुरू झालं.
80च्या दशकात पारले ग्लूको झाला Parle-G
ऐंशीच्या दशकापर्यंत पारले-जी ला ग्लुको बिस्किट म्हटलं जायचं. त्यानंतर नाव बदलून ते पारले-जी ठेवण्यात आलं. जी म्हणजे जीनियस. तर पारले शब्द हा मुंबईतील विले-पार्ले या परिसराच्या नावावरून घेतला गेला. नाव बदलल्यानंतर बिस्किट पाकिटावरील फोटोही बदलला. सुरुवातीला कव्हरवर गाय आणि गवळणीचा फोटो होता. त्या फोटोतून बिस्किटातून दुधाप्रमाणेच एनर्जी मिळत असल्याचा संदेश देण्यात आला होता. पारले-जी नाव ठेवल्यानंतर गवळणीचा फोटो हटवून एका चिमुकलीचा फोटोला घेण्यात आला तो आजतागायत पारले-जीच्या रॅपरवर झळकतो आहे.
गेल्या लॉकडाऊनमध्ये मोडला 82 वर्ष जुना रेकॉर्ड
गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि पारले-जी बिस्किटांनी एक नवा रेकॉर्ड केला. पारले-जी बिस्किटांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आणि त्यांचा 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. त्यामुळे कंपनीच्या एकूण मार्केट शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. यापैकी 80-90 टक्के वाढ पारले-जी च्या विक्रीत झाली आहे. भारतात सद्यस्थितीत पारले-जी चे 130 पेक्षा जास्त कारखाने असून 50 लाख रिटेल स्टोअर्स आहेत. मग आवडली ना ही तुमच्या लाडक्या बिस्किटाची गोष्ट? आता पुढच्या वेळी बिस्किट खाताना तुम्हाला नक्की आठवेल ही गोष्ट.