महाराष्ट्रामध्ये 14 रेडझोन मधील जिल्हे वगळून एक जूननंतर लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर दिसून येत आहे. पण सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात कडक निर्बंध लागू केले. महाराष्ट्रात सुरुवातीला 15 दिवस निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु, हळूहळू त्याची मुदत राज्य सरकारतर्फे वाढवण्यात आली. सध्या महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सलग दोन वेळा वाढवल्यामुळे 1 जून नंतरही महाराष्ट्रातील लॉकडाऊन कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच मुंबईची जिवनवाहीनी समजली जाणारी मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. यासंबंधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.मुंबईतील लोकल आणखी 15 दिवस सर्वसामान्यांसाठी बंद ठेवावी लागेल. तसेच लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे, असं मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रातील 14 जिल्हे सध्या रेडझोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावावाच लागेल' असं विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं आहे.

महाराष्ट्रामध्ये 14 रेडझोन मधील जिल्हे वगळून  एक जूननंतर लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर दिसून येत आहे. पण सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post