मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याची माहिती सायरा बानो यांनी दिली आहे. दिलीप कुमार यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजते. सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणलं आहे. कोरोनामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी यावेळी त्यांच्या लग्नाचा 54 वा वाढदिवससुद्धा साजरा केला नव्हता.
दिलीप कुमार यांचे वय सध्या 98 वर्षे इतकं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. डॉक्टर त्यांची नियमित तपासणी करत आहे.दिलीप कुमार यांनी ट्विटरवरून नुकतंच एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये कोरोनच्या संकटात सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, सर्व लोकांनी सुरक्षित राहा.
कोरोनाच्या संकटकाळात दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले आहे. त्यामुळेच सायरा बानो यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं होतं. दिलीप कुमार यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली होती. दिलीप कुमार यांनी भावंच्या निधनाने झालेलं दु:ख व्यक्त केलं होतं.