मिरज : धनंजय हलकर :
मिरज,,वखार भाग कोकणे गल्ली मिरज येथे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे एका कावळ्याचे घरटे मोडुन खाली पडले, त्यात काही पिल्लांचा समावेश होता,, अचानक झालेल्या प्रकाराने ,दोन्ही कावळ्याने दिसेल त्या व्यक्तीवर चोचीने हल्ले केले, 5 जणांना जखमी केले,,रात्र भर आक्रोश केला,,आज झालेला प्रकार श्री,शिवाजी मेंडले यांनी राहत एनीमल श्री लकडे यांना कळविले त्या नंतर श्री.डॉ.दिलीप शिंगाणा व किरण नाईक यांनी सां.मि. कु. अग्निशमन दलाचे श्री शशिकांत चव्हाण(चालक) व श्री. रोहित निकम (फायरमन)व श्री अमोल सरवदे,,यांनी शिडीच्या सहाय्याने, त्या कावळ्यांच्या उद्ध्वस्त झालेला संसार परत त्यांच्या पिल्ला सहित उभा केला,हे करत असताना डॉ,दिलीप यांना कावळ्याने हल्ला केला,,त्याची पर्वा न करता त्यांनी हाती घेतलेलं, काम पूर्ण करून सोडलं त्यांच्या या कार्यास त्रिवार अभिवादन.
या वेळी श्री कौलापूरे बंधू, यांनी देखील मदत केली,,दरची बातमी ही प्रसिद्धी साठी नसून,, अश्या घटना कुठे ना कुठे घडत असतात,,तेव्हा ,, आपली जबाबदारी म्हणून योग्य ठिकाणी माहिती कळविले असता, एक चांगले कार्य घडू शकते,, ह्याचे समाधान काही वेगळाच आनंद देऊन जाते
अशा घटना ह्या पुढे घडल्या तर अथवा कळली तर संपर्क साधून,, निसर्गाची सेवा करता येईल,,