मिरज : धनंजय हलकर :
सां.मि.कु. शहर महानगरपालिकेच्या प्रभाग स.क्र.४ व वार्ड क्र. २० येथील पंढरपूर चाळ वसाहत येथे गेली अनेक दिवस झाली अशुद्ध व सांडपाणी मिश्रीत पाणी पुरवठा होत आहे. पंढरपूर चाळ वसाहत येथील स्थानिक रहिवासी नागरिकांनी वार्डातील निर्वाचीत नगरसेवक तसेच इ. जबाबदार पदाधिकारी यांचे कडे ड्रेनेजचे पाणी मिश्रीत पाणी पुरवढ्या बाबतीत लेखी व तोंडी तक्रारी दिल्या आहेत._
तरी देखील लोकप्रतीनिधी यांचे कडून अशुद्ध पाणी पुरवठ्या बाबतीत गांभीर्य दिसत नाही.पंढरपूर चाळ वसाहतीमधील रहिवासी नागरीकांना अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे वेगवेगळे साथीच्या आजाराने ग्रासलेले निदर्शनास येते आहे.सा.मि.कु. महानगरपालिकेचे आधिकारी, सदस्य येऊन पिण्याच्या पाण्याची समस्या पाहून वेगवेगळी आश्वासने देऊन जात आहेत. पण प्रत्यक्षात स्वच्छ पाणी पुरवठा कधी होईल, अशुद्ध पाण्याची समस्या कधी दुर होईल ह्या बाबतीत कोणीच काही बोलत नाही.
तरी पंढरपूर चाळ वसाहत वार्ड क्र. २० येथील पिण्याची पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत करून, स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणेत यावा यासाठीचे निवेदन आज दि. १९/०५/२०२१ रोजी महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मा. शिवाजी चंदनशिवे यांना रिपाइं चे शिष्ठमंडळा मार्फत देणेत आले.
_पंढरपूर चाळ वसाहत येथील पिण्याचे पाणी पुरवठा व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करून मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करावा अन्यथा रिपाइं मिरज शहर व येथील स्थानिक नागरिक मिळून तिव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडू अशा इशारा ही यावेळी देणेत आला._
या वेळी रिपाइंचे युवा नेते मा. श्वेतपद्म कांबळे, आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे, मिरज शहर उपाध्यक्ष मा. सुनिल(मिठू) माने, मिरज शहर संपर्क प्रमुख मा. प्रमोद वायदंडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.