मग आता बोंबलून उपयोग काय ?



Artical written by- Dr. Amitkumar Goilkar


आज कित्येक लोकं आरोग्य  यंत्रणांच्या नावाने खडे फोडत आहेत. यंत्रणा शेण खात नाहीत तर 500 रुपयांचे पाकीट, मटणाची 2 फोडं आणि फुग्यातल्या घाणेरड्या दारूच्या भिकेपोटी मत विकणारा मतदार त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी मतदान न करता हॉलिडे एन्जॉय करणारा सुशिक्षित समाज शेण खातोय म्हणून हे सगळं घडतंय. अडानचोट, घराणेशाही जोपासणारा, त्या पदासाठी लायक नसणारा, नालायक उमेदवार निवडून देण्याची किमया आमचे मतदारच करतात ना ? 

मग आता बोंबलून उपयोग काय ?

आमदार, खासदाराला आपल्या मतदार संघाविषयी काहीही घेणे नाही. बऱ्याच नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या स्थानिक नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे म्हणून त्यांना आपल्या वॉर्डात काहीही करायचे नाही. सत्ताधाऱ्यांच्या 3 किलो गहू आणि 2 किलो तांदळाची वाट गरीब जनता बघत आहे. सातासमुद्रापार परदेशातून मदत आली, पण राज्यातल्या राज्यात मदत वेळेत मदत मिळत नाही. विरोधकांना सत्तेचा चळ सुटलाय. काहीही करून पुन्हा खुर्च्या मिळवायच्याच या उद्देशाने सगळे लॉबिंग सुरू आहे. सोशल मिडियावर प्रश्न विचारणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 

काही रक्तपिपासू डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासने लोकांना *जाणीवपूर्वक जीवे मारत असल्याच्या* आरोपांच्या बातम्या/व्हिडीओज रोज सोशल मिडियावर धडकत आहेत. हे सगळे पाहून सामान्य लोक भयभीत झाले आहेत. पण जे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल स्टाफ पैशासाठी हे सगळं करत असतील त्यांच्या 100 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. 

देशात लोकसंख्येच्या केवळ 1 टक्के लोक संक्रमित आहेत तर सरकारी यंत्रणांची ही दैना उडाली आहे. विचार करा हा टक्का वाढला तर काय हाहाकार माजेल ? कोविड काळातच हॉस्पिटल्सना लागणाऱ्या आगी संशयास्पद आहेत. हे मेंटनन्स यंत्रणांचे अपयश आहे की या अंदाधुंदीचा फायदा घेऊन कुप्रवृत्तींकडून या आगी लावल्या जाताहेत हे कळायला मार्ग नाही. सुरुवातीला काही लोकप्रतिनिधींनी आणि नगरसेवकांनी स्वतःची लाल  करण्यासाठी केले अन्नदान. पण कुणाला ? तर सधन वर्गाला. डोळ्यांवर रे-बॅन चे गॉगल लावून मदत घेणाऱ्यांच्या लायनीत उभ्या असलेल्या निर्लज्ज सधन लोकांना पाहून वाटले की ही समाजसेवा आहे की *पुढच्या इलेक्शनची तयारी ? जनतेचा पैसा लुटून लठ्ठ झालेल्या चोरट्या दानशुरांचे हात थोड्याच दिवसांत अखडले. कारण आपण लुटलेला पैसा संपेल पन ही महामारी एवढ्यात संपणार नाही हे या धुर्तांनी पक्के ओळखले.

निवडणुकांमध्ये आपल्या थोबाडावर भीक मारून आपली मते नाही तर आपले मुलभूत अधिकारच या भांमट्यांनी विकत घेतले आहेत. आता तरी जागे होणे गरजेचे आहे. 

येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत घराणेशाही, अपात्र, गुंड, चोर प्रवृत्तीच्या, पैशाने मतं विकत घेणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यायचे की सामान्य लोकांच्या समस्यांची जाण असलेल्या सामान्य उमेदवाराला निवडून द्यायचे हे जनता जनार्दनाने सद्सद्विवेक बुद्धीने ठरवावे. नाहीतर, यापेक्षा भयानक तडफडीने मरणाऱ्यांच्या यादीत आपल्या भावी पिढ्या असतील हे वेगळे सांगायला नको.

डॉ. अमितकुमार गोईलकर.

_मानसोपचार, सायकोथेरपिस्ट._

Post a Comment

Previous Post Next Post