मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला



कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वच आंबेडकरवादी संघटनेसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला.

संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवातआरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला संभाजीराजेंनी सुरुवात केली.या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. कोल्हापुरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने मी अत्यंत ऋणी आहे. कोल्हापूर - पंढरपूर - सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद - नांदेड असा त्यांचा आजचा दौरा असणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post