कोल्हापूर: काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूरसाठी इच्छुक अधिक होते, त्यांची सांगड घालून राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेवदारी दिली होती. भाजपनं एखाद्या विजयाने त्यांनी हुरळून जायची गरज नाही. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या निवडणुका आम्ही जिंकल्या आहेत, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.तेज पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीबद्दल बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य उमेदवाराला किती मत पडली हे देखील पाहावं लागेल. आगामी काळात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत राहावं, अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचं दिलेलं नाव कोणामुळे अडकलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. भाजपला मदत होईल, अशी भूमिका राजू शेट्टी घेणार नाहीत, असं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलं.
भाजपच्या विरोधात लाट
भाजपच्या विरोधात लाट आहे, हे विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन दिसतेय. केंद्राने कोविड परिस्थिती हाताळताना केलेला दुजाभाव, निवडणुकीमुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष केलं, याचा हा परिणाम आहे. गेल्या काही वर्षांत सात राज्य भाजप च्या हातातून गेली आहेत. लाखोंच्या सभा घेतल्या म्हणजे लोक मत देतात असं नाही. सामान्य माणसाला कोणतीही मदत केली नाही याची चपराक भाजपला बसली आहे. इथून पुढे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या बाजूने कौल राहील याची मला खात्री आहे, असं देखील पाटील म्हणाले.