कोरोना बाधित रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरनी चांगली रुग्णसेवा द्यावी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तासगांव येथील आम्ही तासगांवकर कोव्हिड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री यड्रावकर यांनी काढले उदगार.. मिणचे (वडगांव) व जयसिंगपूर येथे ही राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरचा शुभारंभ





प्रेस मीडिया वृत्तसंस्था : 

तासगांव-

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह महाराष्ट्रात आलेली दुसरी लाट भयावह अशी आहे, शासनाचा आरोग्य विभाग पूर्ण ताकतीने या संकटाला सामोरे जात आहे,वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही खाजगी डॉक्टर्स एकत्रित येऊन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोव्हिड केअर सेंटर सुरू करीत आहेत, या सेंटर मधून रुग्णांना सेवा देत असताना रुग्णांना  चांगली सेवा वाजवी दरात उपलब्ध करून द्यावी असे आवहान सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले, रुग्णांचे प्रमाण जरी कमी होत असले तर येणारे आणखी काही दिवस चिंताजनक असणार आहेत, कोरोना ची तिसरी लाट येण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत, या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठी बाधा होईल असेही म्हटले जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, तासगांव येथील आम्ही तासगांवकर या कोव्हिड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते, तासगांव नंतर मिणचे वडगांव व जयसिंगपूर येथेही कोव्हिड सेंटरचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला,

जयसिंगपूर येथील डॉक्टर अमरजीत जगदाळे यांनी सुरू केलेल्या नित्या आर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते रविवारी कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ झाला यावेळी उद्योजक शहाजीराव जगदाळे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पांडुरंग खटावकर, नगरसेवक महेश कलकुटगी, शिवसेना शहर प्रमुख तेजस कुऱ्हाडे, अर्जुन देशमुख, पिंटू पाराज, डॉक्टर अंकलंक चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते,

मिणचे तालुका हातकणंगले येथे गोकुळ चे नवनिर्वाचित संचालक व हातकणंगले चे माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुजित मिणचेकर फाउंडेशन व युवाशक्ती मिणचे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचा शुभारंभ राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला,

यावेळी डॉक्टर सुजित मिणचेकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे सभापती प्रविण यादव, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती हंबीरराव पाटील, शिवसेनेचे हातकणंगले तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते, सांगली जिल्ह्यातील तासगांव येथे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते आम्ही तासगांवकर या कोव्हिड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते दादा, नगरसेवक अभिजीत भोसले, शेतकरी कामगार पक्षाचे अजित सूर्यवंशी, संजय गिड्डे, अरुण खरमाटे, विवेक कांबळे, तासगांवच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, गटविकास अधिकारी श्रीमती दिपा बापट, डॉक्टर विवेक सागर यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post