विक्रम शिंगाडे : बेळगांव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
बेडकिहाळ येथील दसरा कमिटीचे अध्यक्ष अशोक आण्णा नारे यांचे अल्पशा आजाराने दि-23 रोजी निधन झाले. कर्तव्यदक्ष कार्यकर्ते, मनमिळाऊ स्वभाव, वेगवेगळ्या संघ संस्थांचे पदे त्यांनी भुषविले. बेडकिहाळ येथील जेष्ठ नागरिक आणि जत्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून अहोरात्र मेहनत करून कार्य करनारे तरुणांना प्रोत्साहन देणारे आनी तरुणांना लाजवेल असा एक तडफदार नेतृत्व बेडकिहाळ गावाने गमावले. बेडकिहाळ गावावर शोककळा पसरली आहे. ते सर्वसामान्यांचे आधारवड होते. कला, क्रिडा, राजकीय व कुस्ती अशा अनेक क्षेत्रामध्ये ते मनापासून कार्यरित होते. त्यामुळे त्यांचे नाव अनेक राज्याराज्या मध्ये पोहचले आहे. दसरा महोत्सवमध्ये कूस्ती पालखी अशा ईतर मनोरंजन कार्यक्रम मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. बेडकिहाळच्या राष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये त्यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले होते. असे नेते पडद्याआड झाल्याने बेडकिहाळ व परिसरामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे व सर्व सदस्य सहभागी आहेत.