आज शिरोळ येथे तहसीलदार कार्यालयामध्ये महापुराच्या संबंधित आढावा बैठक पार पडली.या आढावा बैठकीमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर*साहेब यांनी संभाव्य महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला.



आज शिरोळ येथे तहसीलदार कार्यालयामध्ये महापुराच्या संबंधित आढावा बैठक पार पडली.या आढावा बैठकीमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर*साहेब यांनी संभाव्य महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जेणेकरून तालुक्यामध्ये महापुराचा धोका उद्भवू नये याकरिता साहेबांनी आढावा बैठक घेतली.या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रीमहोदयांनी महापूराचा धोका कशा पद्धतीने आटोक्यात आणता येईल याकरिता उपाययोजनेसाठी विचार विनिमय केले.

 या बैठकीवेळी मंत्रीमहोदयांनी आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये महापुराची स्थिती उदभवू नये याकरिता कर्नाटक राज्याचे पाटबंधारे विभागाचे श्री सी.डी.पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधला.

  त्या बैठकीस तालुक्याचे तहसीलदार सौ.अपर्णा मोरे धुमाळ मॅडम ,शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. अमरसिंह भैय्या मानेव तालुक्यातील अधिकारीवर्ग व पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post