इचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून इचलकरंजी शहरासाठी औषध फवारणी करिता घेणेत आलेल्या ४ ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रमाणात वाढत असल्याने नगर परिषदेच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.या अनुषंगाने इचलकरंजी शहरात औषध फवारणीकरणेसाठी ट्रॅक्टर खरेदी करणेसाठी खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या निधीतून इचलकरंजी नगर परिषदेस ३०लाख मंजूर केले होते.सदर निधीमधून १००० लिटर क्षमतेचे डब्बल स्प्रेईंग युनिटचे फोर्स कंपनीचे ४ ट्रॅक्टर पासिंग सह खरेदी करणेत आले आहेत.
सदर ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा आज २३ एप्रिल रोजी नगर परिषद प्रांगणात नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,बांधकाम सभापती उदयसिंह पाटील,पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार,नगरसेवक रविंद्र माने, मनोज हिंगमिरे, राजु बोंद्रे,रविंद्र लोहार, युवराज माळी, माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, महादेव गौड, शहाजी भोसले, सयाजी चव्हाण, बंडा मुळीक, अमृता भोसले,वाहन विभागाचे संजय कांबळे यांच्या उपस्थितीत करणेत आला.