देशातील कोरोना रुग्णांसाठी पुण्यात मागितली दुआ



पुणे :   देशातील कोरोना रुग्णांच्या निरामय आरोग्यासाठी तसेच कोरोना साथी दरम्यान सर्वांचे रक्षण व्हावे यासाठी   पुण्यात आझम कॅम्पस मशीदीत  दुआ मागण्यात आली . शुक्रवारी दुपारी फेसबुक लाईव्ह द्वारे झालेल्या 'जुम्मा नमाज ' मध्ये ही दुआ मागण्यात आली . 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर  मुस्लीम बांधवाना नमाज  साठी मशिदीत न येता घरबसल्या त्यात सहभाग घेता आला .मौलाना नसीम अहमद आणि शराफत अली यांनी नमाज पठण केले. अमीन शेख यांनी फेसबुक लाइव्ह ची तांत्रिक बाजू सांभाळली. 

पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात दर रोज  सायंकाळी नमाज -ए -तराविह चे  देखील फेसबुक लाईव्ह द्वारे  पठण  करण्यात येत असून मुस्लीम बांधवानी घरबसल्या सहभागी व्हावे ,असे आवाहन आझम कॅम्पस शैक्षणिक सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी केले आहे . राज्यात निर्बंध जाहीर झाल्यानंतर ९ एप्रिल पासून जुम्मा नमाज फेसबुक लाईव्ह द्वारे सुरु करण्यात आली असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.    

                                                                       

Post a Comment

Previous Post Next Post