महापालिका तसेच ससून रुग्णालयात ऑक्‍सिजन पुरवठा वाढवा, अशी मागणी मनपा विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.



पुणे - महापालिका तसेच ससून रुग्णालयात गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, या दोन्ही ठिकाणी ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने नवीन बेड वाढवणे शक्‍य होत नाही. तेथे तातडीनं ऑक्‍सिजन पुरवठा वाढवावा, अशी मागणी मनपा विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली.

विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, यावेळी उपस्थित होते. त्यानंतर गटनेत्यांनी सीओईपी येथील जम्बो कोविड सेंटरलाही भेट दिली. शहरातील एकूण रुग्णांच्या 20 टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयांत आहेत.तेथे दररोज सुमारे 60 ते 65 टन ऑक्‍सिजनची गरज असताना केवळ 45 टन ऑक्‍सिजनच मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑक्‍सिजनची उपलब्धता नसल्याने या ठिकाणी मृत्यू वाढत असल्याचेही या शिष्टमंडळाने राव यांच्या निदर्शनास आणून दिले.

पुणेकरांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे तातडीने ऑक्‍सिजन पुरवठा वाढवल्यास स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरिबांसाठी बेड वाढवणे शक्‍य होणार असल्याचे सांगत त्यासाठीही उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर आयुक्‍त राव यांनी या गटनेत्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा करत त्यांना प्रशासकीय बाबी सांगितल्या. शिवाय येत्या काळात हे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post