संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यादृष्टीने मराठी भाषेत एका नाविण्यपूर्ण मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक वैशिष्ट्ये असलेल्या मराठी भाषेतील या मोबाईल अॅपचे नाव "महासंपर्क अॅप" असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हा अॅप डाउनलोड केला जात आहे.
सदरील "महासंपर्क अॅप" च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, शहर, तालुके व गावातील पत्रकारांची फोटोसह माहिती सहज उपलब्ध होणार आहे. महासंपर्क अॅप मध्ये प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया व इलेक्टॉनिक मीडिया अशा सर्व पत्रकारांची नोंदणी केली जात असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
सदरील "महासंपर्क अॅप" मध्ये वर्तमानपत्र किंवा पोर्टलचे किंवा चॅनलचे नाव, लोगो अथवा टायटल बॅनर, थोडक्यात माहिती, पत्रकाराचे नाव, पत्रकाराचा फोटो, मोबाईल नंबर व पत्ता टाकण्यात येत आहे. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करणारी यंत्रणा नव्हती, मात्र आता या मोबाईल अॅपमुळे एका क्लिकवर समस्त पत्रकारांची माहिती उपलब्ध होणार आहे.
सदरील अॅपचा मुख्य उद्देश म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा तालुका व गाव निहाय पत्रकारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, महाराष्ट्रातील पत्रकार एकमेकांच्या संपर्कात यावेत, संपर्क व संवाद वाढावा, एकमेकांच्या जिल्ह्यात सहकार्य व्हावे, अडीअडीमध्ये संपर्क साधता यावा.
तसेच एखाद्या व्यक्तीस पत्रकार परिषद घ्यायची असल्यास अथवा पत्रकारांना निमंत्रण द्यायचे असल्यास सहज संपर्क व्हावा, पत्रकारांना काही उद्योग व्यवसाय करायचा असल्यास एकमेकांच्या जिल्ह्यातील माहिती घेता यावी, प्रशासन पदाधिकारी, नेते, जाहिरातदार व जनतेला पत्रकारांशी सहज संपर्क साधता यावा, अशा विविध कारणांसाठी पत्रकार बांधवांना व नागरिकांना हा मोबाईल अॅप संपर्काच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्रातील अनेक पत्रकार व पत्रकार संघटनांनी सदरील अॅपचा उपक्रम अभिनंदनीय व कौतुकास पात्र असल्याचे नमूद केले आहे.
सदरील मोबाईल अॅप मध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांची सशुल्क नोंदणी सुरू असून आतापर्यंत अनेक पत्रकारांनी नोंदणी सुध्दा केली आहे. सर्व पत्रकारांनी 9890515043 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन महासंपर्क अॅप च्या वतीने करण्यात आले आहे.
सदरील मोबाईल अॅप वापरण्याच्या दृष्टीने सर्वांसाठी प्ले स्टोरवर फ्री मध्ये उपलब्ध असून ॲपमध्ये नोंदणीसाठीही नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, चांगली स्पीड, फुल स्क्रीन मध्ये माहिती, अनेक सुविधा तसेच वापरण्यास सहज व सोपा असलेला हा "स्वदेशी" अॅप आपणांस नक्कीच आवडेल यात शंका नाही.