नागरिकांना प्रवासासाठी ई पास बंधनकारक.



 कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शासनाने एक मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले असून जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यामुळे खूपच अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना राज्यार्तंगत तसेच जिल्हा अंतर्गत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या ई-पास घेणे बंधनकार आहे. त्यासाठी राज्य पोलिस दलाकडून एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यावरून नागरिक अर्ज करून ई-पास मिळवावा लागणारआहे.

नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी ई-पास दिला जाणार आहे. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू (आई, वडील, भाऊ, बहिण, चुलत भाऊ-बहिण, दीर, मेहुणे) झाला, ई-पास देणार आहे. तसेच, कोणी गंभीर आजारी असेल तरी प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार आहे.त्यासाठी नागरिकांनी नातेसंबंध व आजारपणा पुरावा बाळगावा लागणार आहे. अशा कारणांसाठी राज्यातर्गंत व देशार्तंगत प्रवास करण्यासाठी पास मिळेल. त्यासाठी covid19.mhpolice.in वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

ई पाससाठी असा करावा लागेल अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जावे. त्याठिकाणी ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे.त्या पोलिस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलिस विभाग निवडावा. त्यानंतर स्वतः चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते टाकेवे. मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, कोणत्या वाहनाने प्रवास करणार आहात त्या वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबत प्रवाशांचा संख्या याची माहिती टाकावी. त्यानंतर स्वतः चा फोटो, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट, कंपनीचे ओळखपत्र त्या ठिकाणी जोडावे. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासून त्या विभागाच्या पोलिस यंत्रणेकडून ई-पास दिला जाईल.

पोलिसांच्या सूचना

डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या ओळखपत्रावर प्रवास करता येईल. त्यासाठी प्रवासाचे कारणाचे प्रमाणपत्र बाळगावे लागेल.
राज्यातर्गंत प्रवासासाठी अत्यावश्यक कारण असेल तर खासगी वाहने, बसने प्रवास करता येईल. त्यासाठी नेमूण दिलेल्या आसन क्षमतेचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी गेला तिथे होम गृहविलगीकरणात 14 दिवस राहवे लागेल.
व्यवसायासाठी राज्यातर्गंत प्रवासाला बंदी आहे.
विमानाने प्रवास करून आल्यास त्याला बोर्डींग पास दाखवून टॅक्सीने प्रवास करता येईल.
वकिलांची कार्यालय उघडी असल्यामुळे त्याना खासगी वाहने व बसमधून प्रवास करता येईल.
पुणे शहराच्या हद्दीत येण्यास व जाण्यास कोणत्याही पासची कार्यप्रणाली अस्तित्वात नाही. तपासणी नाक्यावर काटेकोरपणे कागदपत्रे तपासली जातील.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

पहिल्या दिवशी 2 हजार अर्ज

पुणे पोलिसांकडे पहिल्या दिवशी सायंकाळी सहापर्यंत ई-पाससाठी तब्बल 2 हजार 77 अर्ज आले होते. त्यापैकी 286 जणांस ई-पास देण्यात आला आहे. तर 375 नागरिकांचे अर्ज आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. ई-पाससाठीचा कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे. या ठिकाणी एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, 20 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी ई-पास प्रणालीचे उद्घाटन केले.

Post a Comment

Previous Post Next Post