-राज्यातील करोना स्थिती हाताबाहेर गेली आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसताना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेले रेमडेसिविर देखील आता मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. त्यातच रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाने जगावे की मरावे. ? असा प्रश्न पडला आहे. वास्तविक ज्या हॉस्पिटल मध्ये रूग्ण ऍडमिट आहे त्या हॉस्पिटल ची जबाब दारी आहे रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा व रुग्णावर उपचार करण्याची. रुग्णां सोबत असलेल्या नातेवाइकांची नाही. या बाबत राज्य सरकारने लक्ष घालून रेमडेसिविर इंजेक्शन चा साठा उपलब्ध करून देण्यात यावा व रुग्णांन होणारा त्रास कमी करावा अशी मागणी आता रुग्णांच्या नातेवाइकांकडून होऊ लागली आहे.
Tags
Latest