खासदार धैर्यशील माने यांच्या स्वनिधीतून इचलकरंजी शहरासाठी औषध फवारणीकरिता घेणेत आलेल्या १००० लिटर क्षमतेचे डब्बल स्प्रेईंग युनिटसह ४ ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.




खासदार धैर्यशील माने यांच्या स्वनिधीतून इचलकरंजी शहरासाठी औषध फवारणीकरिता घेणेत आलेल्या १००० लिटर क्षमतेचे डब्बल स्प्रेईंग युनिटसह ४ ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.इचलकरंजी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.* *शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने  इचलकरंजी शहरात औषध फवारणी करणेसाठी ट्रॅक्टर व स्प्रेईंग युनिट खरेदी करणेसाठी खास.श्री.धैर्यशील माने यांनी स्वनिधीतून   इचलकरंजी नगरपरिषदेस ३० लाख मंजूर केले होते. सदर निधीमधून १००० लिटर क्षमतेचे, डब्बल स्प्रेईंग युनिटसह फोर्स कंपनीचे ४ ट्रॅक्टर सह खरेदी करणेत आले आहेत.

सदर ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी व उपनगराध्यक्ष श्री.तानाजी पोवार यांच्या शुभहस्ते करणेत आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. महादेव गौड, शिवसेना शहरप्रमुख श्री. सयाजी चव्हाण, बांधकाम सभापती श्री. उदयसिंह पाटील,आरोग्य सभापती श्री. संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती श्री. दिपक सुर्वे, शिवसेना नगरसेवक श्री. रविंद्र माने, श्री. प्रकाश मोरबाळे, श्री. शशांक बावचकर, श्री. मनोज हिंगमिरे, श्री. राजु बोंद्रे, श्री. रविंद्र लोहार, श्री. युवराज माळी, माजी बांधकाम सभापती श्री. भाऊसाहेब आवळे, श्री. शहाजी भोसले, श्री. बंडा मुळीक, पै.श्री. अमृता भोसले व शिवसैनिक उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post