कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अवघ्या सात दिवसांत निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडस कॅडिला या कंपनीने केला आहे.



कोरोना महामारीने अवघा देश त्रस्त झाला असताना काहीशी दिलासादायक बातमी झायडस कॅडिला या कंपनीने दिली आहे. झायडस कॅडिलाच्या 'विराफीन' या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. हे औषध घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अवघ्या सात दिवसांत निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


झायडस कॅडिलाने जाहीर केलेल्या चाचणी अहवालानुसार 'विराफीन'च्या एकाच डोसचे इंजेक्शन घेतल्यानंतर सात दिवसांत 91.11 टक्के कोरोना रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी झाली. तसेच रेस्पिरेटरी डिस्ट्रेसही कमी झाला आहे. या औषधाचा वापर करण्याची परवानगी आता डॉक्टरांना दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post