केंद्रीय राज्यमंत्री भाजप खासदार प्रल्हाद पटेल यांनी आईसाठी ऑक्सीजन सिलेंडरची मागणी करणाऱ्या तरुणाला 'दोन कानाखाली लावीन' अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला



 एकीकडे देशभरात कोरोनाचा कहर वाढत चालला असून बेडस,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविर यांचा तुटवडा जाणवतो आहे. लोकं आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी जिवाचे रान करत असताना, मध्यप्रदेशातील दमोह भागातील एका कोवीड केअर सेंटरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भाजप खासदार प्रल्हाद पटेल यांनी आईसाठी ऑक्सीजन सिलेंडरची मागणी करणाऱ्या तरुणाला 'दोन कानाखाली लावीन' अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

दमोह भागातील कोवीड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल तिथे पोहोचले होते. यावेळी मीडियाचे कॅमेरे समोर असताना केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना कोरोना संक्रमित रुग्णाच्या एका नातेवाईकाने ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल तक्रार करत जाब विचारला.मात्र ही गोष्ट भाजप खासदारांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी तरुणाला 'दोन झापडी' ठेवून देण्याची धमकी दिली. यावर झापडी खाईन पण ऑक्सिजनची व्यवस्था तर करा असं म्हणत तरुणाने आपली हतबलता व्यक्त केलीमंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल

हे सगळे आम्हाला मूर्ख बनवत आहेत त्यात 30 तास उलटले तरी आम्ही अस्वस्थ आहोत, ऑक्सीजन सिलेंडर देणार असल्याचं सांगत आहेत परंतु ऑक्सिजन मिळालेला नाही. ऑक्सिजन नाहीच असे यांनी स्पष्टपणे सांगून टाकावे असे उद्विग्न झालेल्या या तरुणाने म्हटल्याचे वायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येते.

मंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण

या घटनेवर प्रल्हाद पटेल यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले आहे. हा तरुण, डॉक्टर आणि नर्सेस विरुद्ध अभद्र भाषेचा वापर करत होता. केंद्रीय मंत्र्यांनी या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असा दावा स्पष्टीकरणात केला गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दमोहचे खासदार प्रल्हाद पटेल यांच्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. यात पटेल बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला होता. कोरोना संक्रमणाचा प्रभाव वाढत असताना पटेल मात्र येथे फिरकलेही नव्हते, मात्र सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच पटेल दमोहच्या सेंटरमध्ये धावल्याचे दिसून आले

Post a Comment

Previous Post Next Post