लातूर येथील औसा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यां छाया काकडे यांना समजकंटक दिनकर काळे व सुरेश पवार यांची जीवे मारण्याची धमकी.
स्वाती मोराळे :लातूर जील्ह्यातील औसा तालूक्यातील पारधेवाडी येथे महिला व मुलींच्या आरोग्यासाठी समाजसेवीका छाया काकडे यांच्या प्रेरणेतून सॅनिटरी नॅपकीन प्रकल्प चालवीला जातोय.महिला स्वालंबन करण्यासाठी शिलाई मशीन क्लास, गोधडी बनवणे, मिनी ऑइल मिल,मिर्ची कांडप, भात काढणी यंत्र आशा अनेक गोष्टी करत खेड्यातील महिलांना रोजगार दिला आहे. याची दखलअमेरिकेतील युनिव्हर्सिटी ने घेतली आहे.परवाच या प्रकल्पाला अमेराकेतील क्वीनीपीयाक युनीव्हरसीटीच्या फॅकल्टी मेंबर सुजाता गडकर ईव्हा कलघन व अमेरीकेतील ट्रिपल थेटर टी.व्ही. चॅनलच्या ईमा रीचर्डसन यानी भेट दीली सध्या छाया काकडे यांच्या सामाजिक कार्यावर अमैरिकेतील युनिव्हर्सिटी डाॅक्युमेंट्री फील्म तयार केली असुन लवकरच या फील्मचे अनावरण युनीव्हरसीटीमध्ये होणार आहे पण या कामाला गालबोट लावण्यासाठी शेजारच्याच कारला गावातील दीनकर काळे व सुरेश पवार छाया काकडे याना मानसीक त्रास देवून,शीवीगाळ करून संपवण्याच्या धमक्या देत आहेत.
खरंतर समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास देणं ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे.छाया काकडे यानी ही माहीती तक्रार लातूर एस पी आय व डी.जी. यांच्याकडे केली असुन त्वरीत पोलीस संरक्षण देण्याची विनंती ही केली आहे. अश्या प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या विरोधात पत्रकार बांधवानी सोबत राहावे. पुरोगामी महाराष्ट्र मध्ये असे महिलांवर धमकी देणारे प्रसंग होत असेल तर ते शोभणारे नाही.