कोल्हापूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्य शासनाच्या कडक निर्बंधांनुसार जिह्यात सर्वत्र लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिकच कडक करण्यात आली आहे. सकाळी अकरापर्यंत दिलेल्या वेळेतच नागरिकांची वर्दळ असून, त्यानंतर मात्र जिकडे तिकडे शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे. विनाकारण फिरणारे, तसेच नियमभंग करणाऱयांवरही दंडात्मक कारवाईचा फास आवळला गेला आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येत आहेत.
कोल्हापूर जिह्यात गेल्या आठवडय़ापासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक वाढू लागली आहे. महापालिकेचे आयसोलेशन रुग्णालय फुल्ल झाले आहे, तर सीपीआर रुग्णालयातही अत्यवस्थ रुग्णांची दिवसेंदिवस त्यात गेल्या चार दिवसांपासून 25हून अधिक बाधितांचा मृत्यू होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून घरोघरी तपासणी सुरू करण्यात
अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना सकाळी 7 ते 11 अशी वेळ दिली आहे. या वेळेतच भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा घेण्यास मुभा देण्यात आली आहे. आज बहुतांश सर्वच ठिकाणी 11 नंतर रस्ते पूर्णतः ओस पडल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. काही ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आणि कडक तपासणी सुरू आहे. शिवाय विनाकारण फिरणाऱयांवर महापालिकेची फिरती पथके कारवाई करताना दिसत होती. दरम्यान, दुपारनंतर रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याने रिक्षाचालकांनी घरीच राहणे पसंत केले.
रस्त्यावर केलेल्या ऑण्टिजेन चाचणीत सहाजण पॉझिटिव्ह
z मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आज महापालिकेच्या मोबाईल व्हॅनद्वारे सुरू असलेल्या ऑण्टिजेन तपासणीत एका मिठाई विक्रेत्यासह बाहेरील पाच प्रवासी अशा सहाजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यावेळी परिसरातील वृत्तपत्रविक्रेते, फिरस्ते, प्रवासी, तसेच फेरीवाले आदी 46 जणांची ऑण्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यात 40 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर कन्नाननगर झोपडपट्टी येथे एकूण 93 जणांची ऑण्टिजेन टेस्ट करण्यात आली. यात एका 15 वर्षांच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.