भुयेवाडी येथील "तंटामुक्ती" च्या अध्यक्षपदी श्री यशवंत मारूती पाटील यांची निवड...



 भुयेवाडी (ता. करवीर) येथे "तंटामुक्ती" च्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी श्री जयवंत चौगले हे होते.

    या वेळी सर्वानुमते श्री. कृष्णा दुध संस्थेचे विद्यमान चेअरमन मा.श्री. यशवंत मारूती पाटील (भाऊ) यांची "तंटामुक्ती" च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांनी विठ्ठल विकास सेवा संस्थेचे चेअरमन म्हणून १० वर्षे काम पाहिले आहे.

     या बैठकीस नुतन सरपंच श्री सचिन देवकुळे, उपसरपंच श्री संभाजी खोत, व ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री संभाजी पाटील, बाबासाहेब पाटील, अमर ऊरूणकर, राणी पाटील, सुवर्णा हराळे, अस्मिता पाटील, भाग्यश्री पाटील, मनिषा पाटील, शारदा पोवार, गीता चौगले, अमृता कुंभार आदी उपस्थित होते.

    स्वागत सरपंच श्री सचिन देवकुळे यांनी केले तर ; आभार उपसरपंच श्री संभाजी खोत यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post