हुपरी (वार्ताहर)
पालिकेची कोणतीही परवानगी नाही, कोणताही शासकीय परवाना नाही तर केवळ हुपरीमधील धनदांडग्या शक्तीच्या जोरावर हुपरीमध्ये एका डॉक्टरने खाजगी कोविड सेंटर सुरु केले आहे. हुपरी शहराच्या गावभागातील बस स्थानकाजवळच्या एका प्लाझामध्ये हे सेंटर बेधडक सुरु असून या डॉक्टरला मोठा राजकीय वरदहस्त असल्याने त्या जोरावर सदर डॉक्टरने हे सेंटर सुरु केले आहे. हुपरीतील जुने बस स्थानक परीसर म्हणजे अतिशय गजबजलेला भाग आहे. या प्लाझामध्ये बॅंक, दवाखाना, कोल्ड्रींक हाऊस, जीम असे विविध व्यावसायिक आहेत त्यामुळे या ठिकाणी सतत वर्दळ असते.
दरम्यान हा प्रकार पाहून हुपरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी या डॉक्टरला नोटीस बजावली आहे.परंतू हे डॉक्टर कुणालाही जुमानत नाहीत असा त्यांचा इतिहास आहे. मागील वर्षीही माळभागावर एका हॉटेलमध्ये या महाशयांनी असेच कोविड सेंटर सुरु केले होते परंतू नंतर लोकांच्या वाढत्या तक्रारी पाहून त्याला गाशा गुंडाळावा लागला होता. आतासुध्दा लोकांच्या तक्रारी आहेत परंतू राजकीय आशिर्वादाने हे सेंटर सुरु राहते की बंद करावे लागते ते येणारा काळच सांगणार आहे.
रेंदाळ :
रेंदाळ मधील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की रेंदाळ गावचे ग्रामविकास अधिकारीश्री.एस.बी.हसुरे हे शुक्रवार दिनांक 23/4 /20 21 रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून आरोग्य उपकेंद्र रेंदाळ येथे संपर्क साधून स्वाब तपासणी करण्यात यावी जेणेकरून कोरोना संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी ही विनंती.
अध्यक्ष,तथा लोकनियुक्त सरपंच ,सचिव ,सदस्य कोरोना प्रतिबंध समिती ग्रामपंचायत रेंदाळ