हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
तारदाळ येथील असणाऱ्या ङाँ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने दलित वस्ती मधिल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तसेच ङाँ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे काम ही अपुऱ्या निधी अभावी रखङले गेले असून तारदाळ ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे मंदिर दुरुस्तीचे काम सन 2017-18 चा फंङ व 14 वा वित्त आयोग अतंर्गत दुरुस्तीचे काम चालू होते बर्याच प्रमाणात काम पुर्ण झाले आसून अपुऱ्या निधी अभावी समाज मंदिराचे रखडले असल्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षात समाज मंदिर बंद अवस्थेत आहे.
समाज मंदिरामागे पडकी विहिर बुजवण्याचे काम ग्रामपंचायतीकङुन गावातील कचरा गोळा करून विहीरी मध्ये टाकण्यात येत होता परंतु ग्रामपंचायतीकङून सदर विहिर मुरूम टाकून सपाटीकरण करून घेणे आवश्यक होते परंतु ग्रामपंचायातीकङुन तसे न केल्यामुळे सदरचा परीसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गधीयुक्त बनला आहे.परिणामी ङासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याची दखल घेऊन त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.