वैजापूर ता 28 बातमीदार :
मास्क न घातल्याच्या कारणावरुन येथील पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता दिपक बरकसे यांना एपीआय निलेश काळे यांनी शिविगाळ केल्याचा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रविवारी (२८ मार्च ) निषेध नोंदवण्यात आला. संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असुन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्रकार संघाचे सचिव मकरंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, गणेश पैठणकर यांनी निवेदन स्वीकारले. संघाची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विजय गायकवाड.भानुदास धामणे.प्रशात त्रिभुवन.शातराम मगर.काकासाहेब लव्हाळे .फैसल पटेल, बाबासाहेब धुमाळ, सुनिल त्रिभुवन, नितिन थोरात, शैलेंद्र खैरमोडे, सैय्यद मन्सुर अली, शेख रियाजुद्दीन.अमोल राजपूत, विलास म्हस्के, प्रा. आबासाहेब कसबे, डॉ. हरेष साबणे, विशाल त्रिभुवन, दिपक बरकसे, दिपक थोरे.संदीप गायके.सचिन कुमवात.त्रिभुवन, किरण राजपूत, शेख अजहर, मिलिंद वाघमारे उपस्थित होते.
फोटो ओळ: पत्रकारास शिविगाळ केल्याबद्दल तालुका पत्रकार संघाचे सचिव मकरंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना निवेदन