वैजापूर : शहरातील जुना बसस्थानक परिसरातील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते दिपक बरकसे हे रोजनिशी प्रमाणे आज (ता.२७) रोजी त्यांचे वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होते. कडकडीत उन्हात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दीपक यांनी पाणी पिण्यासाठी मास्क बाजूला काढला, यावेळी पेट्रोलिंग दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे हे आपल्या लावाजम्यासह त्याठिकाणी आले. यावेळी त्यांनी दिपक यांना कंबरेखालच्या (अश्लील) भाषेत शिवीगाळ केली. केळे शिवीगाळ करत असताना सोबत असलेल्या इतर पोलीस कर्मचारी यांनी दिपकभाऊ एक जबाबदार नागरिक तथा पत्रकार आहेत असे सन्मानीय केळे यांना सांगितले मात्र केळे हे कुठल्याही कर्मचारी यांचे म्हणणे ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते...
सहायक पोलीस निरीक्षक केळे यांनी वृत्तपत्र विक्रेते/पत्रकार यांना केलेल्या दमबाजीमुळे वैजापूरात लोकशाही की हुकूमशाही ? असा प्रश्न उपस्थितीत झाला. शिवाय पत्रकार बांधवाना केळे यांच्याकडून अशा प्रकारची वागणूक तर सामान्यांना कशी वागणूक मिळत असेल ? हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थितीत होत आहे. आज घडलेल्या घटनेचा वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जाहीर निषेध...