पुणे: राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्यातच मुंबई,पुण्यासारख्या शहरात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी अधिकचे निर्बंध लागणार का याचा निर्णय आज घेतला जाणार आहे.
पुण्यामध्ये गेले काही सातत्याने रुग्ण संख्या वाढते आहे. त्यातच आता गंभीर रुग्णांना बेड मिळेना अशी परिस्थिती आली आहे. ही एकूण परिस्थती लक्षात घेता अधिकचे निर्बंध किंवा लोकडाऊन याचा विचार सुरु असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. दरम्यान आर्थिक घडी बिघडू नये म्हणून लोकडाऊन नको अशी भूमिका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली जात आहे.दरम्यान सध्या १० ला लॉक असा निर्णय घेण्यात आला तरीशहरात त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसतनाहीये.१० नंतर देखील लोक गर्दी करत आहेत. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन देखील होताना दिसत नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर आज अधिक निर्बंध की लॉकडाऊन हे ठरवण्यात येणार आहे.