पुणे- बंडगार्डन पाेलीस ठाण्याचे आवारात वर्षानुवर्ष धुळ खात पडलेली बेवारस व विविध गुन्हयातील जप्त वाहने यांचे मुळ मालकांचा शाेध घेवुन ती वाहने मुळ मालकांना परत देण्याचे आदेश पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले हाेते. त्यानुसार बंडगार्डन पाेलीस व गंगामाता वाहन शाेध संस्था यांनी अनेक वर्ष धुळ खात पडलेल्या वाहनांचे च्यासी नंबर व इंजीन नंबरवरुन दाेन दिवसातच एकुण ५५ वाहनांपैकी ४५ वाहनाचे मुळ मालकांचा शाेध लावला आहे.
बंडगार्डन पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक यशवंत गवारी म्हणाले, पाेलीस ठाण्यात शेकडाे वाहने विविध गुन्हयात पाेलीस जप्त करतात. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने सदर वाहने पाेलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मालकाच्या प्रतिक्षेत धुळ खात पडू हाेते.ही बाब लक्षात घेवसुन बेवारस वाहनाच्या मालकाचा शाेध घेण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.
सदर शाेध लागलेल्या वाहनांचे मालकांनी आपली वाहने आोळख पटवुन व पुरावे देवुन परत घेवुन जाण्याबाबत आवाहन पाेलीसांनी केले आहे. गंगामाता वाहन शाेध संस्थेच्या मदतीने सदर शाेध लागलेल्या एकुण ४५ वाहन मालकांशी संर्पक साधला जाणशर आहे. सदरची वाहने १५ दिवसात मालक घेवुन न गेल्यास ती बेवारसू समजुन कायदेशीर प्रक्रिया करुन सदर वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येईल. पाेलीस निरीक्षक (गुन्हे) अभय महाजन,सहा.पाेलीस फाैजदार गाेपाल परदेशी, महेश फड, गंगामाता संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ, शिवाजी जव्हेरी, रामजी यांना याकामी यश आले आहे.