ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले तोच भ्रष्टाचारा बद्दल बोलतो आहे....



मुंबई - पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. 

बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केले आहे. या सर्व मुद्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सोशलवर मविआ सरकारवर भाजप नेत्याकडून टीका केली जात आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारने ६०० कोटींचा SRA घोटाळा केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.यावरून आता राजकीय वर्तुळात कलगीतुरा रंगला असून या दाव्यावर मविआ सरकारने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'स्वप्नात हजारो लाखो कोटींचा भ्रष्टाचार बघणा-यांनी SRA मध्ये स्वप्नात 600 कोटींचा भ्रष्टाचार बघितला आहे. हिम्मत असेल तर भ्रष्टाचाराचा रुपयाचा तरी पुरावा द्या.ज्याच्यासाठी आपण आरोप केला आहे. त्या क्षणाला माझा राजीनामा पाठवून देईन. उगाच येड्यावानी गावभर बोंबलत फिरू नका'

ते पुढे म्हणाले,'ज्यांनी गरिबांच्या संडासातून करोडो रुपये खाल्ले तोच भ्रष्टाचारा बद्दल बोलतो आहे' तत्पूर्वी,उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक आढळल्यापासून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यातच वाझे यांच्या चौकशीमुळे सरकार अडचणीत आलं असताना परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post