इचलकरंजी (प्रतिनिधी) :-
जुन्या आणि नवोदीत खेळाडूंना प्रोत्साहन आणि समाज बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आचार्यश्री आनंद युवा मंचच्यावतीने आयोजित ‘एवायएम जेपीएल हाफपिच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघाने अजिंक्यपद मिळविले. तर फ्रेण्डस फॉरएव्हर संघ उपविजेता ठरला. तीन दिवस संपन्न क्रिकेटेप्रेमींनी या स्पर्धेस उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेत अनेक रंगतदार व रोमहर्षक सामने पाहण्यास मिळाले. विजेत्या संघांना स्पर्धेचे मुख्य प्रायोजक भरत-अखिल-निखिल बोहरा, प्रथम क्रमांक प्रायोजक जीवनराज मुकेशकुमार पुनमिया, द्वितीय क्रमांक प्रायोजक प्रकाशलाल प्रितमकुमार बोरा, मंडळाचे आधारस्तंभ दिलीप मुथा ,अरुण ललवाणी आदींच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
गत सहा वर्षापासून आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने ही स्पर्धा भरविली जात आहे. यंदा स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये फ्रेण्डस फॉरएव्हर, प्रसन्न बॉईज, युनिटी स्पोर्टस् व पेरीटस रायडर्स या चार संघांनी साखळी सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. त्यामध्ये फ्रेण्डस फॉरएव्हर विरुध्द प्रसन्न बॉईज यांच्यातील सामना फे्रण्डस फॉरएव्हरने जिंकला. तर युनिटी स्पोर्टस् व पेरीटस रायडर्स यांच्यातील उपांत लढत रंगतदार झाली. निर्धारीत षटकात दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली. पण सुपरओव्हरमध्ये पेरीटस रायडर्स ने हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली. फे्रण्डस फॉरएव्हर विरुध्द पेरीटस रायडर्स यांच्यातील अंतिम सामनाही चांगलाच रंगला. पेरीटस रायडर्सने दिलेले 109 धावांचे आव्हान पेलताना फे्रण्डस फॉरएव्हर संघाने शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना 94 धावाच करता आल्याने पेरीटस रायडर्सने एवायएम जेपील चषकावर आपले नांव कोरले.
स्पर्धेदरम्यान नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष सुनिल मुंदडा तेरापंथ चे उपाध्यक्ष प्रविण कांकरीया, प्राज्ञ युवक मंडल अध्यक्ष सुभाष जैन, महावीर मित्र मंडल उपाध्यक्ष भरत सालेचा, स्थानकवासी जैन युवक मंडल अध्यक्ष राहुल बोरा, कोषाध्यक्ष मनोज कोठारी, श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ व गुरुदेव सेवा बहुउद्देशीय मंडल अध्यक्ष श्रीकांत चंगेडीया, चंदूभाऊ छाजेड, चंद्रकांत पाटील आदींनी भेट दिली. स्वागत व प्रास्ताविक मंचचे अध्यक्ष प्रितम बोरा यांनी केले. आभार सुमित मुनोत यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी करण मुथा, राजेंद्र बोरा , सुमतीलाल शहा , दिनेश चोपडा,मयूर पिपाडा, महेंद्र बोरा, नीलेश मुथा, रितेश चोपडा, प्रफुल्ल बोरा,सुदिन चोपडा,जितेंद्र जैन, आदेश कटारिया ,अक्षय शहा, लाभम ,योगेश भलगट , संजय मुथा,स्वप्निल बोरा, राकेश बंब,यश बोहरा,अक्षय बोहरा, पंकज बाबेल ,रूपेश चोपडा , नितीन बोरा,मुकेश चोपडा यांनी प्रयत्न केले.