हुपरी मंडल कार्यालयाचा कारभार दलालांच्या हातात.



हुपरी  : हुपरी मंडल कार्यालयामध्ये कामकाज पाहणेसाठी मा.मंडल अधिकारी यांची शासनाने नियुक्ती केली असताना शासनाचा कुठलाही आदेश नसताना मा. मंडल अधिकारी यांनी *वरची कमाई* करणेकरीता *विजय श्रीपती शिंदे* या दलालाची नेमणूक केली आहे. मंडल कार्यालयातील कामाचे कोणतेही विशेष शिक्षण नाही, यासंबंधी कोणत्याही प्रकारची डिग्री नाही, कोणत्याही प्रकारची नेमणूक वा नियुक्ती नाही असे असताना शिंदे हा दलाल *मंडल कार्यालयाचा हेड ऑफिसर* बनला आहे. मंडल कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना लुटत सुटला आहे. नागरीकांना शासकीय कामासंबंधी विशेष माहिती नसते मग या कार्यालयात ते आले की त्यांच्या कामाचे नाहक गंभीर स्वरूप धारण करून त्या नागरीकांना भिती घालून शिंदे हा दलाल दिवसाढवळ्या त्यांच्या खिशावर दरोडा घालत सुटला आहे.

नगरपरिषद झाल्यापासून तर शिंदे याला मोकळीक मिळाली आहे. कारण नगरपरिषद कार्यालय मराठी शाळेत नेल्यामुळे ह्या कार्यालयात गर्दी कमी असते.परिणामी बिनबोभाट केवळ पैसे गोळा करणे सोपे झाले आहे.या कार्यालयात कधीतरी यावे लागत असलेने नागरीकही कसेही काम होऊंदे म्हणून पैसे देत असतात. पण शिंदे याला चांगलीच हाव सुटली असून त्याची पैशाची भूक वाढतच चालली आहे.

सदर विजय श्रीपती शिंदे याची मंडल अधिकारी यांनी केलेली नेमणूक ही बेकायदेशीर असून शिंदे ही व्यक्ती नागरीकांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. असे असतानाही मंडल अधिकारी यांनी त्यास कामावर ठेवले आहे.ही बाब गंभीर असून त्यास तात्काळ कामावरून काढून टाकावे अन्यथा कायदेशीर मार्गाने  *मंडल अधिकारी हुपरी* यांचेवर गुन्हा दाखल करणेत येईल अशी नोटीस वसंतराव पाटील संपादक हुपरी समाचार यांनी *मंडल अधिकारी हुपरी* यांना पाठवली असून याच्या प्रती मा.मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, पुणे आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी पाठवल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post