हुपरी : हुपरी येथे शहरातील बेघर कुटुंबाना येथील गट नं ९२५ /८अ १ या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतुन घरकुल बांधून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांनी मागणी केलेनुसार आवश्यक कागदपत्रांची ताबडतोब पूर्तता करावी या मागणीसाठी नगरपरिषदेसमोर प्रापंचिक साहित्य व चुली मांडून अनोखे व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी आंदोलनासमोर येवून तात्काळ मागणीची पुर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
Tags
Latest