महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ शासन निर्णयाची करणार होळी




धुळे... महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयाकडून इयत्ता दहावी मधील कलाप्रेमी विद्यार्थी व विद्यार्थिनींना सवलतीचे वाढीव कलागुण देण्याबाबत कटू निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निवेदन 26 मार्च 2021 रोजी, शासन निर्णय क्रमांक ए. डी .आर.2021/प्रक्र/15/ताशि-6, मंत्रालय मुंबई यातील मुद्दा क्रमांक दोन शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना या वर्षाचे सवलतीचे वाढीव गुण इयत्ता दहावी मध्ये देण्यात येऊ नये अशा पद्धतीने शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील तमाम सात ते आठ हजार विद्यार्थी या कला सवलतीच्या गुणांपासून वंचित राहणार आहेत. ही बाब गंभीर असून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ याचा जाहीर निषेध करत आहे. हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अन्यथा दिनांक 28 मार्च 2021 रोजी होळी हा उत्सव दिनी जळणारी होळी ही या निवेदनाची तमाम महाराष्ट्र राज्यातील शाळा,शाळांमधून, विद्यार्थी ,पालक, कलाशिक्षक, दिनांक 30 मार्च 2021 रोजी शासनाचे हे परिपत्रक जाळून होळी साजरी करतील असा सज्जड इशारा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने माननीय तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पी ए. यांना फोन करून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे,अमरावती येथून प्रदेश अध्यक्ष माननीय विनोद इंगोले, धुळे येथून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस माननीय प्रल्हाद साळुंके, औरंगाबाद येथून प्रदेश उपाध्यक्ष, माननीय प्रल्हाद शिंदे,पुणे येथून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ प्रदेश उपाध्यक्ष माननीय किरण सरोदे, प्रदेश सहसचिव माननीय मिलिंद शेलार, मुंबई येथून मुंबई विभागीय अध्यक्ष माननीय मोहन माने, कोल्हापूर येथून,विभागीय अध्यक्ष माननीय, सूनील शिखरे, माननीय सुहास पाटील, माननीय रामचंद्र ईकारे, रायगड येथून, कोकण विभागीय अध्यक्ष माननीय महेंद्र निकुंभ, व सर्व जिल्हा कार्यकारणी यांनी दिला आला आहे. विद्यार्थी हितासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षा इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत केव्हाही दिलेल्या असतात. मात्र एकीकडे covid-19 च्या नावाने या परीक्षा झाल्या नाहीत या कारणाने विद्यार्थ्यांना कला गुण हे सवलतीचे देण्यात येऊ नये ही अतिशय चुकीचा निर्णय घेणे हे विद्यार्थ्यांचे नुकसान व त्यांच्या मानसिक मनावर परिणाम करणारा आहे. वास्तविक एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी पास केल्या आहेत त्यांचे प्रस्ताव माननीय तंत्रशिक्षण मंत्री यांच्याच कलागुण वाढीव प्रस्ताव मुदतवाढ देण्याच्या पत्रावरून महाराष्ट्रातील तमाम शाळांनी बोर्डाकडे असे प्रस्ताव मुदतीत सादर केलेले आहेत आणि आता अशाच प्रस्तावांना वाढीव कलागुण देण्यात येऊ नये असा लेखी आदेश काढणे म्हणजे हा तुघलकी प्रकार या शासनाचा समोर आलेला आहे. सदर परिपत्रक येत्या तीन दिवसात तातडीने मागे घ्यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितार्थ महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ या शासनाच्या परिपत्रकानुसार सह या शासनाची विचारसरणीची होळी नक्कीच करेल असा सज्जड इशारा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने देण्यात येत आहे.

प्रल्हाद साळुंके,प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ.

Post a Comment

Previous Post Next Post