नवदुर्गा अवॉर्डस- लोकमत सखी मंच आणि चंदुकाका सराफ यांचे आयोजनलोकमत नव दुर्गा सन्मान यामध्ये ९ क्षेत्रातील ९ महिलांचा प्रातिनिधिक सन्मान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आला होता विविध क्षेत्रांमध्ये आत्मबळावर धैर्याने काम करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव या अवॉर्डस च्या माध्यमातून होत असतो.शिक्षण क्षेत्रातील ९ महिलांचा सन्मान करण्यात आला होता.यामध्ये आपल्या व्यंकटेश शाळा परिवाराच्या वाटचालीत ज्यांचा प्रमुख सहभाग आहे त्या सौ.मनिषाताई रानमाळे - वारंगयांचा सन्मान झाला होता.
आपल्या व्यंकटेश शाळा परिवारासाठी ही अभिमानाची गोष्ट होती. डॉक्टर शाल्मली व सौ.मनिषाताई या मायलेकींना वैद्यकीय व शिक्षण या त्यांच्या क्षेत्रातील कर्तबगारी बद्दल सन्मान झाला होता. ही एकमेव मायलेकींची जोडी असेल ज्यांचा एका वेळी सन्मान झाला होता. या दोघीही व्यंकटेश शाळा परिवाराचा सदस्य आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मनिषाताई व शाल्मली आपले मनापासून कौतुक व अभिनंदन
सुनिल कल्याणी व व्यंकटेश शाळा परिवार हुपरी (कोल्हापूर)