संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, या प्रामाणिक हेतूने शेतकरी कुटुंबातील एका ग्रामीण पत्रकार बांधवाने नाविण्यपूर्ण अशा मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे.अनेक वैशिष्ट्ये असलेल्या मराठी भाषेतील या मोबाईल अॅपचे नाव "महासंपर्क अॅप" असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हा अॅप डाउनलोड केला जात आहे. पत्रकारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, पत्रकार एकता मजबुत व्हावी, प्रशासन, पदाधिकारी यांच्यासह नागरिकांनाही पत्रकारांशी सहज संपर्क साधता यावा या प्रामाणिक हेतूने या "महासंपर्क अॅप" ची निर्मिती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील शेतकरी व जेष्ठ पत्रकार इब्राहीम पठाण यांचे चिरंजीव परवेज पठाण यांनी या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे.परवेज पठाण हे गेल्या १९ वर्षांपासून संगणक क्षेत्रात कार्यरत असून पत्रकारिता पदवीधर आहेत, तसेच मागील ११ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून पत्रकारांसाठी ते नेहमी नवनवीन उपक्रम राबवित असतात.
सदरील "महासंपर्क अॅप" च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, शहर, तालुके व गावातील पत्रकारांची फोटोसह माहिती सहज उपलब्ध होणार आहे. महासंपर्क अॅप मध्ये प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया व इलेक्टॉनिक मीडिया अशा सर्व पत्रकारांची नोंदणी केली जात असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
सदरील "महासंपर्क अॅप" मध्ये वर्तमानपत्र किंवा पोर्टलचे किंवा चॅनलचे नाव, लोगो अथवा टायटल बॅनर, थोडक्यात माहिती, पत्रकाराचे नाव, पत्रकाराचा फोटो, मोबाईल नंबर व पत्ता टाकण्यात येत आहे.आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करणारी यंत्रणा नव्हती, मात्र आता या मोबाईल अॅपमुळे एका क्लिकवर समस्त पत्रकारांची माहिती उपलब्ध होणार आहे.
या अॅपमुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचा परस्परांशी संपर्क व संवाद वाढू शकेल, शिवाय अडीअडचणीत सुध्दा या अॅपची मदत होवू शकेल. या नाविण्यपूर्ण अॅपच्या निर्मितीबद्दल महाराष्ट्रातील अनेक पत्रकार व पत्रकार संघटनांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.आधुनिक तंत्रज्ञान, चांगली स्पीड, फुल स्क्रीन मध्ये माहिती, अनेक सुविधा तसेच वापरण्यास सहज व सोपा असलेला हा "स्वदेशी" अॅप आपणांस नक्कीच आवडेल यात शंका नाही.
सदरील मोबाईल अॅप मध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांची सशुल्क नोंदणी सुरू असून आतापर्यंत अनेक पत्रकारांनी नोंदणी सुध्दा केली आहे. नोंदणीसाठी 9890515043 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी त्वरित करून या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.या मोबाईल अॅप मध्ये नोंदणी फी सामान्यतः 200 असली तरी पत्रकारांसाठी डिस्काउंट असून फक्त 100 रूपयात नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अॅप वापरण्याच्या दृष्टीने सर्वांसाठी प्ले स्टोरवर फ्री मध्ये उपलब्ध असून खालील लिंक द्वारेही आपण "महासंपर्क अॅप" फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=maverick.mahasamparkapp