क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिलांच्या मुक्तिदात्या ठरल्या. केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले.


 क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले  महिलांच्या मुक्तीदात्या ठरल्या - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.



PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई दि. 3 - क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या महिलांना शिक्षणाचे दार खोलून देणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून  ज्ञानज्योति ठरल्या त्याच प्रमाणे  त्या महिलांच्या मुक्तीदात्या ठरल्या आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

बांद्रा येथील संविधान निवासस्थानी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची 190 वि जयंती आज ना.रामदास आठवले आणि सौ. सीमाताई आठवले यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी रिपाइं महिला आघाडी च्या सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. 

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी शैक्षणिक सामाजिक क्रांती केली  नसती तर दिवंगत इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या नसत्या. महिलांना शिक्षण देणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका मुख्यध्यापिका म्हणून त्यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेत प्रचंड संघर्ष केला. हाल अपेष्टा सहन केल्या. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या क्रांतिकारी कार्यात  अनमोल साथ दिली. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1897 रोजी भारतात प्लेगचा  भयंकर साथ रोग आला तेंव्हा त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता  रुग्णांची सुश्रूषा केली असे सांगत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना ना रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले.



          

Post a Comment

Previous Post Next Post