रेणू शर्माच्या वकीलावरच विनय भंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक बातमी समोर आली.
PRESS MEDIA LIVE :
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्माच्या वकिलावरच विनयभंगचा गुन्हा दाखल असल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. रमेश त्रिपाठींवर त्यांच्या महिला असिस्टंटने विनयभंग केल्याचा आरोप असून वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.
माहितीनुसार, 2018 साली रमेश त्रिपाठी यांच्यावर वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. रमेश त्रिपाठी यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी सहायक आयुक्त यांच्यासमोर जबाब नोंदविला होतायावेळी रेणू शर्मा यांच्या वकील अॅड. रमेश त्रिपाठी उपस्थित होते. तसेच मागच्या चार दिवसांपासून आम्ही तक्रार केली आहे. पण ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही निराश आहोत. संबंधित मंत्र्याला ब्लॅकमेल केल्याचा माझ्या अशीलावर जो आरोप केला जातोय, तो खोटा आहे. माझ्या अशीलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून दागिने विकून ती स्वत:ची गुजराण करत आहे. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. सध्या तपास सुरु असल्यामुळे ते पुरावे मी उघड करु शकत नाही. तपासातून अनेक गोष्टी समोर येतील. व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंड बंद होतील. सध्या तपास सुरु असल्यामुळे मी या गोष्टी उघड करु शकत नाही, असे आरोप करणाऱ्या महिलेचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी सांगितले होते.