महात्मा सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, रुग्ण हक्क परिषदेची मागणी.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
पुणे : स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतीज्योती- महात्मा सावित्रीबाई फुले यांची जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आज उत्साहात साजरी करण्यात आली.
रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याहस्ते सारसबाग येथील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी फुले दांपत्यांना भारतरत्न देवून सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी केली.
सावित्रीबाई फुलेंचा विजय असो अश्या घोषणा देत रुग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव दीपक पवार, पुणे जिल्हा प्रभारी गिरीष घाग, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठये, प्रदेश सचिव संध्यारानी निकाळजे, शहराध्यक्ष विकास साठये यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.